न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका, निर्मलाताई कुटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खंडागळे, जितेश जगताप, पालक सविता काळे, प्रिया हिबारे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नाझनीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवीच्या सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गाणे गायले. तसेच निशा पवार मॅडम यांनी “गुरुचे महत्त्व” याविषयी मुलांना मार्गदर्शन केले आणि नदीम रजा, सोहम गायकवाड ,आरुष हिबारे , श्रावणी सोळुंके , स्वराली शिंदे या मुलांनी शिक्षकांविषयी माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा साळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्पिता तिवारी यांनी केले.












