न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- टेलीग्राम अकाऊटवर दोघा महिला आरोपींनी वेबसाईटवरून फिर्यादीला मेसेज पाठवला. व्हीडीओचा रिव्हु टास्क देण्याच्या व सुरुवातीला बक्षिस देउन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकुण १,५८,००० रुपये स्वत:च्या वेगवेगळ्या अकाउंटवर घेउन संदेशवहन साधनांचा वापर करून तोतयागिरीने फिर्यादीची फसवणूक करून रकमेचा अपहार केला.
ही घटना (दि.३१/०३/२०२३) ते (दि. ०१/०४/२०२३) पर्यंत भोळी, खंडाळा, जिल्हा सातारा येथे घडली. फिर्यादी केशवराव तानाजी पवार (रा. देहूरोड) यांनी दोघा महिला आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३५५/२०२३ भादवि कलम ४२०, ४०६, आयटी अॅक्ट ६६ (सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा हा देहुरोड पोलिसांनी शिरवळ, खंडाळा, सातारा येथील पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे.












