न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- आपसांत संगणमत करुन फिर्यादी यांचा विश्वासघात केला. फसवणुक करण्याच्या उदेशाने ऑनलाईन तांत्रीक पध्दतीचा वापर करुन फिर्यादीला लिंक पाठवली. वेळोवेळी फिर्यादीला प्रीपेड टास्कचे काम देवून त्यापोटी पैसे मिळतील असे आमिष दाखविले.
कामासाठी फिर्यादीला आरोपी चौघांनी वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगून फिर्यादी यांची एकुण ७,७२,९३७ (सात लाख बाहत्तर नऊशे सदतीस) रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १४/०३/२०२३ पासुन दि. २७/०३/२०२३) रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घरी यमुनानगर, निगडी येथे घडली.
फिर्यादी महेश आकाराम सुर्यवंशी यांनी अज्ञात इसम मोबाईल धारक (मो.नं. ९०११००९२८६), नितीन नावाचा इसम (त्याचा पुर्ण नांव पत्ता नाही) त्याचा मोबाईल नंबर ९९५३१८५५१९, संदिप नावाचा इसम (त्याचा पुर्ण नांव पत्ता नाही), राहुलकुमार वर्मा नावाचा अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३९२/२०२३, भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४ माहिती तंत्रज्ञान अधि – २००० चे कलम ६६ डी प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.












