न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- मोपेड गाडीवरून फिर्यादीचा भाऊ घरी येत असताना विनापरवाना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकने त्यांच्या गाडीला पाठिमागुन धडक दिली.
अपघातात फिर्यादीच्या भावाचा मृत्यू झाला. तसेच गाडीचे नुकसान झाले. आरोपी त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे. ही घटना (दि. १३) रोजी १०.३० वाजता सेलेस्टा सोसायटी समोरील सर्विस रोड, कुदळवाडी, चिखली येथे घडली.
फिर्यादी तोसीफ रमजान पठाण यांनी आरोपी टाटा कंपनीचा ट्रक नंबर (एम एच १४ ए एस ८०३९) यावरील अज्ञात चालकच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ४३९/२०२३ भा. दं. वि. कलम २७९, ३०४(अ), ४२७, २८३ व मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















