न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- गुगल मॅपचा रिव्ह्यू लिहल्यास प्रत्येक रिह्युसाठी २१० रुपये मिळतील, असे फिर्यादीच्या व्हॉटसअपवर आरोपीने चॅटिंग केले. टेलिग्राम ग्रुप तसेच युनियन बँकेचा अकाउंट धारक व टेलीग्राम चॅनल वेबसाईट वापरकर्ता यांनी फिर्यादीला टास्क दिला. प्रत्येक टास्कला २१० रुपये मिळतील, असे म्हणुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
वेगवेगळया अकाऊंट व यु.पी.आय.डीवर पैसे पाठवण्यास सांगून टास्क पुर्ण करुन देखील फिर्यादीचे पैसे परत न करता वेगवेगळ्या अकाऊंट नंबरवर फिर्यादीला एकुण १,०५,००० रुपये पाठवण्यास सांगुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी सकाळी फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर हिंजवडी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी टेलीग्राम चॅनल कॉईन स्विच डेटा टास्क नावाचा टेलिग्राम ग्रुप, अनोळखी सत्यम राजोरीया हा युनियन बँकेचा अकाउंट धारक व टेलीग्रॉम चॅनल https://coinnetwork.top/ वेबसाईट वापरकर्ता यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७९८/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.














