न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- एमआयडीसीतील चोरीच्या प्रकारांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. एमआयडीसीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी उद्योजकांशी चर्चा करण्यात येईल. तसेच एमआयडीसीत पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल. कामगार, उद्योजकांना नाहक त्रास दिल्यास कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पिंपरी- चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांनी दिला.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व इंडस्ट्रिज असोसिएशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त कोपनर बोलत होते.
यामध्ये अल्पवयीनांना देखील गुन्हेगारी कृत्य करण्यास भाग पाडले जाते. एमआयडीसी परिसरात भंगाराची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जात आहेत. यातील काही दुकानांवर चोरीचा माल घेतला जातो. त्यामुळे चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेतल्यास एमआयडीसीतील चोऱ्यांचे प्रकार कमी होण्यास मदत होऊ शकेल. प्रत्येक हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि कंपन्यांनी आपल्याकडील कामगारांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.












