- आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- चिंचवडचे राहुल कलाटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत उदय सामंत होते.
याबाबत ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना राहुल कलाटे म्हणाले, कुठल्याही जनसामान्यांना कनेक्ट होणारा नेता, अशी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आज संपूर्ण राज्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
माजी नगरसेवक संपत पवार, नवनाथ जगताप, अश्विनी वाघमारे आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढे कसे जायचे, पुढची दिशा काय असेल? हे लवकरच कळेल, असे ते म्हणाले.
याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सोबत बहुसंख्य कार्यकर्ते होते. पक्ष प्रवेश कुठे होणार याबाबत लवकरच कळेल.












