- या नऊ कारभाऱ्यांची जयंत पाटलांकडून नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये ९ जणांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आज जाहीर केली आहे.
या शहर कार्यकारिणी समितीत सुनिल विजय गव्हाणे-चिंचवड, इम्रान युनूस शेख-भोसरी, काशिनाथ जगताप-भोसरी, प्रशांत सपकाळ-चिंचवड, देवेंद्र तायडे-पिंपरी, मयूर जाधव-चिंचवड, काशिनाथ नखाते-भोसरी, राजन नायर-पिंपरी, शिला भोंडवे-चिंचवड यांची निवड करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात सर्व समिती सदस्य एकमताने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य करतील. शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य शहरात जोमाने कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.












