न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 18 जुलै 2023) :- न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नाझमीन शेख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
या निमित्ताने शाळेतील शिक्षिका रेणू राठी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मुलांना माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन भावना देवरे यांनी केले.












