- शरद पवार गटाकडून मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२३) :- राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह चार कार्याध्यक्षांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या वतीने पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी (दि. १८) करण्यात आली आहे.
बडतर्फीची कारवाई झालेल्यांमध्ये शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी, फजल शेख यांचाही समावेश आहे. राज्यातील २१ पदाधिकाऱ्यांवर पक्षाने ही कारवाई केलेली आहे. दरम्यान, पक्षाने सोमवारी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.
यात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ, काशिनाथ जगताप, मयूर जाधव, राजन नायर, शीला भोंडवे यांचा समावेश आहे.












