न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील लाखो रुपयांची बँक फोडी करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांना वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिसांनी बारा तासांच्या आता मुद्देमालासह अटक केली आहे.
फैसल इब्राहीम शेख (वय २९ वर्ष, रा. विजयनगर, पिंपळेगुरव, मुळ रा. उल्हासनगर, जि.ठाणे), शाहरुख सत्तार पटवारी (वय २८ वर्ष रा. वाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागील चाळीमध्ये, औंध, पुणे; मुळ रा. तळनी ता. औसा जि.लातुर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशन हद्दीत (दि. ९) रोजी फेड बँक, डांगे चौक, वाकड येथे आरोपींनी दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न पोलीसांच्या सतर्कतेमुळे निष्फळ झाला होता. या गुन्हयात बँकेची भिंत फोडुन गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या वेळी सतर्क नाकाबंदी करुन, बँक, ज्वेलर्स, शॉपी परिसरात तपासणीचे आदेश दिले होते. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.
उर्वरीत आरोपींच्या शोधासाठी पेट्रोलींग सुरु असताना (दि. १८) रोजी माळशिरस, सोलापूर येथील बँक फोडलेले आरोपी मोहननगर रोड, पिंपरी येथे येणार आहे अशी, खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कारमधून संशयीत इसम व सोबत आणखी एक इसम उतरले. त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. त्यांनी माळशिरस, सोलापुर येथे बँक फोडुन चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील रोख रक्कम ४,१०,००० रुपये जप्त करण्यात आली आहे.आरोपीना सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि- २. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहया संदीप गवारी, पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शोख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि, अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशिसोदागर लामतुरे, पोशि बिनायक धारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.












