- दिघीत तरुणांकडून व्यवसायिकाला मारहाण; कोयत्याने हॉटेलची तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- ‘हॉटेल चालवायचे असेल तर हप्ता दया’ अशी आरोपी आणि त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादीच्या वेटरला मारहाण केली. फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिला असता पुन्हा हॉटेलवर येवुन आरोपी व त्याच्या साथिदारांनी हातातील कोयते व तलवारीने हॉटेलच्या दरवाजावर कोयत्याने वार केले.
हॉटेलच्या बोर्डवर वार करीत सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. ज्युपीटरवर कोयत्याने वार करून तिचे नुकसान केले. तसेच हॉटेलवर दगड मारून परिसरात दहशत माजवुन आरोपी निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १७) रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास व (दि. १८) रोजी रात्री ००.१५ च्या सुमारास ‘हॉटेल उमंग, दत्त नगर बसस्टॉप मागे, आळंदी रोडवर, दिघी येथे घडली.
फिर्यादी राजेंद्र आण्णा तापकीर यांनी आरोपी अनिकेत ऊर्फ गुहा संजय मेटकर (वय २० वर्षे), तीन अनोळखी साथिदार निष्पन्न आरोपी रोहित उमेश लोखंडे (वय १९ वर्ष धंदा शिक्षण रा. दिघी), अभिषेक विकास आढाव (वय १९ वर्ष रा. तनिष होम, परांडेनगर, दिघी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ३०८/२०२३ भा.द.वि कलम ३८५, ३८७, ४२७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ०४,२५, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ). १३५ किमीनल लॉ अमेंडमेंडट अॅक्ट ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.












