- चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजच्या मागणीकडे पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- चिंचवड येथील प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल आणि प्रतिभा महाविद्यालयात सुमारे सात हजाराहून अधिक विद्यार्थी शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पालक सभेमध्ये जागरूक पालकांनी कायद्यानुसार शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करण्यास कायद्याने बंदी असताना संकुलाच्या गेटसमोरील टपर्यामधून त्याची सर्रास विक्री होत आहे. मुले व्यवसनाधीन होत आहेत. याला तातडीने प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
प्रतिभा शैक्षणिक संकुलाच्या गेटसमोरच दुकानातून तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री होत आहे. येथे विद्यार्थी, इतर लघु-उद्योगातील कामगार आदी ये-जा करतात. त्याची विक्री केली जाते. पालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांना होत असलेली विक्री तातडीने बंद करण्याबाबत लेखी निवेदन संस्थेच्या वतीने 23 ते 26 मे दरम्यान दिले होते. त्याचे प्रमुख कारण येथील शाळा, महाविद्यालयात अल्पवयीन मुले तसेच, तरूण मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असतात. व्यवसनाधीन होवू नये यासाठी संस्था आग्रही आहे. त्याची अद्यापपर्यंत कोणतीच उचीत कारवाई झाली नाही.
संस्थेसमोरील दुकानाची तपासणी करून गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्री करणार्यांवर कायमस्वरूपी विक्री बंद करण्यासंदर्भात उचित कारवाई करावी, अशी लेखी मागणी दिलेल्या निवेदनात संस्थेच्या वतीने केली आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.












