- माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कुदळवाडी शाळेत आठवीच्या नवीन वर्गास तसेच इतर वर्गास आणि बालवाडीसाठी शिक्षक उपलब्ध करून द्या, अशी मागणी फ प्रभागाचे माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कुदळवाडी शाळा क्र. ८९ या शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये इयत्ता ८ वी चा नवीन वर्ग सुरु करण्यात आला आहे. या वर्गाच्या २ तुकडया चालू आहेत. सध्यस्थितीत शाळेत एकूण २३ वर्ग तुकडया असून शाळेचा पट १००० आहे. दररोज नवीन अॅडमिशन चालू आहेत. शाळेत मनपाचे फक्त १२ शिक्षक व मानधनाचे ६ शिक्षक धरुन एकूण १८ शिक्षकच उपलब्ध आहेत.
उर्वरित आठ वर्गाना शिक्षक उपलब्ध नसल्याने शाळेतील शिक्षकाना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच बालवाडीचा सदयस्थितीतील पट १२० असून एकच बालवाडी शिक्षिका उपलब्ध आहे. नवीन अॅडमिशन चालू आहेत. अनेक पालकांच्या तक्रारी शिक्षक नसल्याने येत आहेत. या विषयाचा गांभीर्याने विचार करुन शाळेसाठी ८ शिक्षक व २ बालवाडी शिक्षिका उपलब्ध करुन दयावेत, असे निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.












