न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- डोसा बनविण्याच्या दुकानात आरोपी हे डोसा खाण्यासाठी आले होते. सह आरोपीने डोशाची प्लेट तव्यावर ठेवली. दरम्यान चटणी तव्यावर पडल्याने फिर्यादी त्याला ‘तुला चटणी पाहीजे असले तर मी आणुन देतो. तु तव्यावर प्लेट ठेवु नको’. असे बोलले. त्याला त्या गोष्टीचा राग आला व त्याने शिवीगाळ करुन आरोपीचा साथीदार आरोपी यांनी मिळुन फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व लाकडी बॅटने मारहाण करुन उजव्या हाताला जखमी केले.
तसेच फिर्यादी यांच्या सोबतचा कामगार याच्या खिशातील १०,००० रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला. दुकानाच्या गल्ल्यात जमलेले ११०० रुपये काढून घेतले. एकुण ११,१०० रुपये किंमतीचा ऐवज घेऊन सर्व आरोपी पसार झाले , असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २१) रोजी ९.०० वाजेच्या दरम्यान आदेश डोसा सेंटर, वाय. सी. एम. डेड हाऊस समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी विजय जगन्नाथ यादव (रा. संततुकाराम नगर, पिंपरी) यांनी आरोपी निक्की उर्फ दिलीप चौहाण (वय अंदाजे २८ वर्षे, रा. नेहरुनगर, पिंपरी), जाफर (पुर्ण नांव माहीत नाही,. वय अंदाजे २५ वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७६४ / २०२३ भा.दं.वि कलम ३९४,५०४, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे हे करीत आहेत.












