- तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- अपहृत इसम रणजित मेलासिंग (वय ७० वर्षे) यांनी आरोपीकडे फिर्यादी यांच्या सास-यांनी गुंतवणुकीसाठी दिलेले सहा लाख रूपये परत मागण्याचा तगादा लावला. मुख्य आरोपीने दोघा सह आरोपींच्या मदतीने अपहृत इसमाचा खुन करण्याच्या उद्देशाने त्यांना ४ लाख रुपयांची सुपारी दिली. अपहृत व्यक्तिला चिंचवडगाव येथे बोलावुन घेतले. त्यांना त्यांच्या घरातुन मारुती सुझुकी ब्रेझा गाडीने (दि. १९) रोजी सकाळी १०.३० ते दु. ०३.०४ वाजेच्या दरम्यान त्यांचा खुन करण्यासाठी कोठेतरी पळवुन नेवुन त्यांचे अपहरण केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार केशवनगर, चिंचवडगाव येथे घडला. फिर्यादी आदित्य पाकलपाटी सन/ऑफ पीआरबी राजु (रा. हैद्राबाद) यांनी फिर्यादी नारायण बापुराव इंगळे (वय ४६ वर्षे रा. चिंचवडगाव), राजेश नारायण पवार (रा. चिखली), समाधान ज्ञानोबा म्हस्के (रा. चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ३१५/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४,३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक प्रकाश जाधव हे करीत आहेत.












