न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३ एप्रिल) :- शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेञात असलेल्या काळेवाडी फाटा ते चिखलीकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गालगत दिशाफलक लावण्यासाठी खड्डा खोदलेला आहे.
हा खड्डा गेल्या पाच दिवसांपासुन तापकिरनगर येथील जशनानी ट्रेडससमोर खोदलेला आहे. या खड्यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी, या घटनेची आपण गांभीर्याने दखल घेऊन, तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत. अन्यथा अपघात झाल्यास आपल्या विरूद्ध शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी, असे या पत्रात दाखले यांनी म्हटले आहे.










