न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी (गवई गट) (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार जोमात सुरु आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तापकीर नगर, आझाद चौक, ज्योतिबानगर या परिसरात माजी विरोधी पक्ष नेते मच्छिंद्र तापकीर हे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अक्षरशः परिसर पिंजून काढीत आहेत.
घरोघरी, सोसायटी व परिसरातील मंडळे आदींना तापकीर भेटी देत आहेत व प्रचाराचे पत्रके वाटप करून, पार्थ पवार यांनाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांना युवा नेते सागर तापकीर, सचिन लिमकर, अंनत कुलकर्णी, शिवाजी तेंलगे, आबा शिंदे यांचेही सहकार्य मिळत आहे, असे तापकीर यांनी सांगितले.










