न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३ एप्रिल) :- पुणे लोकसभा मतदारसंघातून उच्चशिक्षित राजेश अग्रवाल यांनी निवडणूकीत आपले दंड थोपटले आहेत. राजेश अग्रवाल यांना हमारी अपनी पार्टी कडून अधिकृत उमेदवारी राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे.
राजेश अग्रवाल गेल्या २५ वर्षापासून लायन्स क्लब, अग्रवाल समाज तसेच साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून समाजकार्य करित आहेत. राजेश अग्रवाल यांकडून आज उमेवारी अर्ज भरण्यात आला आहे. यावेळी आपले शक्ती प्रदर्शन करित मिरवणूक काढली.
यावेळी हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. भाजपा, कॉग्रेसकडून अर्ज भरल्यानंतर हमारी अपनी पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी अर्ज भरला आहे.










