न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या वतीने प्रभाग क्र.२ मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे , अतिरिक्त आयुक्त २ विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळॆ यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता रचना दळवी, प्रियंका म्हस्के, मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्र. २ मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील ०२ बेवारस वाहनांवर व फ़ुटपाथवरील ०५ टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आज करण्यात आलेल्या या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, अग्निशमन दल (चिखली), सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करुन नये तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, आयुक्त यांच्या निर्देशनानुसार कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.















