- आरोपी अल्पवयीन; एकजन अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- दुचाकीवरून आलेल्या चौघांनी रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांना कोयत्याचा धाक दाखवला. दहशत निर्माण करुन, कोयत्याने जबर दुखापत केली. त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या खिश्यातील २८,००० रूपये किंमतीचे एकुण ७ मोबाईल व ८०,००० रूपये किंमतीची स्प्लेंडर मोटर सायकल जबरदस्तीने हिस्कावुन नेली. जबरी चोरी करुन जाताना सार्वजनीक रस्त्यावर आराडा-ओराडा करुन, दुचाकी गाडयांचे नुकसान करुन, दहशत माजवुन आरोपी निघुन गेले.
ही घटना (दि. ७ ते दि. ८) रोजी रात्री ००.२५ वाजताच्या दरम्यान टॉवर लाईन, मोरे वस्ती, साने चौक, चिखली येथे घडली.
चिखली पोलीस ठाण्यात ५३३ / २०२३ भा. दं.वि. कलम ३०७, ३९४, ३९२, ३२३, ४२७, ५०६, ३४ भाहका. कलम ४ (२५), क्रिमीनल अमेंन्टमेन्ट १९१३ चे कलम ३, ७ व मपोका. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे चौघा विधीसंघर्षीत बालकांवर गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. पोउपनि कुदळे पुढील तपास करीत आहेत.















