न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- पीएमपीएमएल बसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगाने चालवुन हिरो कंपनीची ग्लॅमर मोटार सायकल, तिचा आर. टि. ओ. नं. एम. एच. १४ एफ. ई. ७०९० हिला समोरुन धडक दिली.
मोटार सायकलची पुढील बाजु चेंबुन, फुटुन तिचे नुकसान केले. संदेश गणपत भंडदे यांना गंभीर जखमी करुन त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी ०८.०० वा. च्या सुमारास रक्षक चौक, पिंपळे निलख, पुणेकडुन औंधकडे जाणा-या रस्त्यावर घडला. सांगवी पोलिसांनी आरोपी वाहनचालक ज्ञानेश्वर संपत बोरगे याच्यावर ४२४/२०२३, भा.दं.वि. कलम २७९,३३८, ३०४(अ), ४२७, मो. वा. का. कलम १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गवारी पुढील तपास करीत आहेत.














