न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- देहूगावातील माळीनगर येथील पद्मश्री डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित सुनिती विद्यालय मापुस्कार गुरुकुल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.
यावेळी अर्थतज्ञ डॉ. मनीष धोटे पाटील, रविकर राऊत, सुजित बर्गे, संस्थापक उषा विठ्ठल मापुस्कर, सह संस्थापक उल्हास आनंद मापुस्कर व सोनाली उल्हास मापुस्कर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीत सादर केले. पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.














