न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी या ठिकाणी ‘मुक्ती पर्व’ दिवस समारोह आयोजित करण्यात आला होता. तसेच पुणे झोनमध्ये काळेवाडी, गंगाधाम, आळेफाटा, आव्हाळवाडी, नानगाव अशा १६ ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील निरंकारी भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले, अशा मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या दिव्य विभुतींच्या प्रति आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.












