न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- महानगरपालिका क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड स्मार्ट सारथी व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकॅडमी आयोजित आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पोदार स्कूल चिंचवड शाळेच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करत द्वितीय पारितोषिक पटकावले.
पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गायनाबद्दल त्यांच्यामध्ये उत्साह येऊन ऊर्जा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून कलागुणांना वाव मिळण्यासाठी मनपा परिसरातील विद्यार्थ्यांकरिता *” चला गाऊया, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा 2023 (ऑनलाइन) स्पर्धा”* दिनांक 27 जुलै 2023 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती.
यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 25 शाळांनी सहभाग नोदिविला होता. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसावर आलेला असताना घेण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील एकूण २५ शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक उमेश पुरोहित आणि संगीत अकादमीच्या टीमने स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन करून सर्व सहभागी शाळांचा उत्साह वाढविला. काही शाळांना पहिल्यांदाच व्यासपीठावर गायनाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी पोद्दार शाळेच्या वतीने संगीत शिक्षक गोपाल सुरवसे यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. विजय संघाचे शाळेच्या प्राचार्या शहनाज कोटार मॅम, उपमुख्याध्यापिका मनीषा घोसरवडे मॅम आणि वैशाली रणसूबे मॅम यांनी कौतुक केले. स्पर्धेतील विजय झालेल्या विद्यार्थांना पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विजयी टीमला गौरविण्यात आले.












