न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक संस्थांद्वारे संचलित प्रिझम इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सुभेदार, मेजर साहेबराव साळुंखे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी निवृत्त पोलिस अधिकारी तात्यासाहेब तापकीर पाटिल, प्रिती तापकीर, अँड कुणाल तापकीर, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिराज मुलाणी, ह.भ.प.स्वामी महाराज, उल्हासराव काटे, संभाजी राव तापकीर, शशिकांत येळवंडे, गुलाबराव ताजणे, अनिल तापकीर, सागर तापकीर, संतोष आंबेकर, शामराव तापकीर, बाप्पु तापकीर पाटील, प्रा.बी.एन.चव्हाण, उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापिका सुरय्या शेख यांनी प्रास्ताविक केले, महंमदशरीफ मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार सिकंदर शेख सर ह्यांनी केला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,कराटे प्रात्यक्षिक, योगा प्रात्यक्षिक, लेझीम पथकांने उपस्थित ग्रामस्थ व पालकांच्या डोळ्यांची पारणे फेडले.
संस्थेला सतत मदत करणारे व नुकतेच टाटा मोटर्स मधुन निवृत्त झालेले सिराज मुलाणी ह्यांचा विशेष सन्मान अँड कुणाल तापकीर ह्यांच्या हस्ते करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून विविध प्रकारच्या कलाकौशल्याचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी प्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला.















