न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने ७७ वा स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन सामाजिक कार्यकर्त्या ऋजुता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तर, मौलाना आझाद स्पोर्टक्लबच्या वतीने साजरा केलेल्या स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, मौलाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे मौलाना खलील शेख, माजी महापौर आर.एस. कुमार, जिगर व्यास, विजय शिनकर, किरण मायावंशी, जिग्नेश पटेल, जतिन परमार, कीर्ती शहा, सचिन कुलकर्णी, अशोक शहा, सुहास करडे, मेहमूद सय्यद, हार्दिक जानी, प्रतिक गरड, नरेंद्र येळकर, जयेश वडोदरिया, लक्ष्मीकांत मावळे, नयन तन्ना, अल्पेश हिरानी आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.















