- चिखलीतील घटना; तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- फेरफटका मारण्यासाठी फिर्यादी मुलगा चौकात गेला होता. दरम्यान आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीकडे मोबाईल मागितला. तो न दिल्याने तिघांनी फिर्यादीला हाताने मारहान करुन वाईट वाईट शिवीगाळ केली.
तेथे पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १४) राजी सायं ६.०० च्या सुमारास स्पाईन रोड शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवरीळ चेरी चौक ते आरंभ हॉटेल, चिखली येथे घडला.
फिर्यादी अल्पवयीन मुलाने आरोपी आकाश केशव गोफणे, अनिकेत, त्यांचा एक मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ५४९/२०२३भा.दं.वि कलम ३२४, ३२३, ५०४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा शिर्के पुढील तपास करीत आहेत.

















