न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- घराच्या दरवाज्याच्या उजव्या बाजुच्या पत्र्याला कशाच्या तरी सहाय्याने होल पाडले. हात आत घालुन आतुन कडी उघडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एकूण १,८०,००० रुपये रोख व ५,००० चा ओपो कंपनीचा मोबाईल फोन असा १,८५,००० रुपये किंमतीचा माल घरफोडी करुन चोरुन नेला आहे.
ही घटना (दि. १४) रोजी मोरेवस्ती, चिखली येथे घडली. फिर्यादी संतोष पंढरीनाथ हाके यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ५५०/२०२३ भा.दं.वि कलम ४५७,३८० प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कुमटकर पुढील तपास करीत आहेत.


















