- परीक्षा केंद्रावरील अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी दक्षता – आनंद रायते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- भूमिअभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट-क) या पदासाठी आज (दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर) या दरम्यान परीक्षा होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान १० दिवस अगोदरच कळविण्यात आले आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक तथा अपर जमाबंदी आयुक्त तसेच राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
रायते यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ या पदांसाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहे. तीन सत्रात परीक्षा होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२ : ३० ते २:३० आणि सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे .तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांच्या दरम्यान परीक्षा होणार नाहीत.
अशा होणार परीक्षा…
पहिला टप्पा : १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा : २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा : ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २३, २४, २५ ऑगस्ट















