न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- फेसबुक अकाउंटवर लिंक आली. आपण वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक आहात काय?, असा फिर्यादीला मेसेज आला. फिर्यादी यांना कामाची आवश्यकता असल्याने त्यांनी त्या लिंकवर रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर आरोपीच्या नावाचे टेलीग्रामवर रजिस्टर असलेल्या आय. डी. वरून फिर्यादी यांना अजुन एक लिंक आली. आरोपीने काम करण्यासाठी एक टास्क दिले. त्या एका टास्कमध्ये सहा काम होते. त्याप्रमाणे आरोपी महीलेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपी महिलेने सांगीतलेवरून फिर्यादी या टास्क पुर्ण करत गेल्या. फिर्यादी त्यांना वेळोवेळी पैसे पाठवत गेले. फिर्यादीच्या अकाऊंटवरुन एकूण ३,९८,२५० रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १३/०७/२०२३ ते दि. १८/०७/२०२३) दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडली. महिला फिर्यादी यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ४४६/२०२३ भा.द.वि. कलम ४१९, ४२०३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६C, ६६D नुसार आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि वारे पुढील तपास करीत आहेत.


















