न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निगडीनगर, देहू गटातर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शब्दरंग कला साहित्य कट्टा तर्फे “धन्य ती बंदिशाळा” एकांकिकेचे रुपी नगर, दक्षता गणपती मंदिर ,तसेच परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर स्केटिंग हॉल प्रबोधनकार ठाकरे मैदान, यमुनानगर, निगडी या दोन्ही ठिकाणी सादरीकरण करण्यात आले.
रूपीनगर येथे डॉ. कुंदन पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य कला संघ, रूपीनगरने केले होते. पूजा काळे, पंढरीनाथ दरेकर, अनन्या शहागडकर, गुरुकृपा संगीत क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
कलाकार सतिश सगदेव, चंद्रशेखर जोशी, सुभाष भंडारे, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, युवराज गायधनी यांनी एकांकिका सादर केली. एकांकिकेचे दिग्दर्शक मा. अशोक अडावदकर, तर संहिता लेखन ज्योती कानेटकर यांचे होते. गीत गायन मनिषा मुळे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी तर ठाकरे उद्यान येथील एकांकिकेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले. दोन्ही ठिकाणी रसिकांची भरपूर उपस्थिती होती, अशी माहिती आनंदराव मुळुक आणि चंद्रशेखर जोशी यांनी दिली.















