न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. खराळवाडी येथील पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे महाराष्ट्र महासचिव अकीलभाई मुजावर व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या नावाने घोषणा देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
बाईक रॅलीच आयोजन युवा नेते खालिद मुजावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या रॅलीमध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, पुणे जिल्हा उप अध्यक्ष दिपक कांबळे, शहराध्यक्ष धम्मराज साळवे, कार्याध्यक्ष नियाज देसाई, उपाध्यक्ष वसीम तांबोळी, युवा उपाध्यक्ष असिफ तांबोळी, सद्दाम हुसेन, भोसरी उपाध्यक्ष अकिब शेख, फिरोज तांबोळी, सलीम पटेल, सोनू शेख, सोहेल मणियार व सदस्य उपस्थित होते.















