न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवून मोहिमेत सहभाग घेतला होता.
या मोहिमेनंतर ध्वजसंहितेचे पालन होणेही तितकेच आवश्यक असल्याने घरावर तिरंगा ध्वज अद्यापही लावलेला असल्यास नागरिकांनी तो व्यवस्धितरित्या त्वरित उतरवून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत शहरात क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाहणी करण्यात येणार आहे.

















