न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरीतील नेहरूनगरच्या नविन कोर्टात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या कार्यकारणीच्या वतीने वकिलांसाठी कायदेविषयक व्याख्यानमालाचे पाचवे पुष्प व्याख्यान पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जेष्ठ विधीज्ञ, माजी उपाध्यक्ष व सदस्य बार कॉऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ॲड. अहमद खान पठाण यांनी क्रिमिनल ट्रायल या विषयावर व्याख्यान दिले. त्या विषयीच्या माहिती पुस्तिकांचे वकिलांना वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रचे अध्यक्ष पिं.चिं. ॲड बार असो मा. अध्यक्ष ॲड. महेश नागरगोजे व प्रमुख उपस्थिती जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळ (भारत सरकार नोटरी) यांची उपस्थिती होती. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, सदस्य ॲड. स्वप्नील वाळूंज, सदस्य ॲड. प्रशांत बचूटे, सदस्य ॲड. नितिन पवार, मा. अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ ,मा. अध्यक्ष ॲड. सुदाम साने, मा. अध्यक्ष ॲड. किरण पवार, मा. अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर व इतर वकील बंधू भगिनी व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कमिटीच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शॉल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वकिलांनी क्रिमिनल केस कशी चालवावी? तिची प्रोसेस समजावून सांगितली. तसेच ॲड. महेश नागरगोजे यांनी वकिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ ॲड. संपत भुजबळ यांनी बार असोसिएशनच्या व्याख्यानमालेसाठी बार असोसिएशनला आर्थिक मदत केली.
कार्यक्रमचे सूत्रसंचलन खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे व सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी केले, तर ऑडिटर राजेश रणपिसे यांनी आभार मानले.


















