न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- वीजपुरवठा खंडित झाल्यास, जलवाहिनी, वितरण वाहिनीला गळती लागल्यास पाणीपुरवठा खंडित होतो. पाणी वितरण प्रणालीत व्यत्यय येतो. त्या वेळच्या परिस्थितीनुसार पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल केले जातात.
पाणीपुरवठ्याविषयक तक्रार असल्यास नागरिकांनी २४ तास सेवेतील तक्रार कक्षाशी किंवा सारथी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यासह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.
सारथी हेल्पलाइन ८८८८००६६६६ आणि पाणीपुरवठा तक्रार कक्ष (२४ तास) ७७२२०६०९९९ यावर नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.















