न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- ताथवडेतील ज्युपीटर आरएमसी अँड इन्फ्रा कंपनीच्या वाहनांसाठी कंपनीतून कर्मचाऱ्यांना डीझेल पुरवठा होतो. दरम्यान कंपनीतील आरोपी कर्मचाऱ्याने जुलै २०२३ पासुन ते दि. ६/०८/२०२३ पर्यंत डिझेलपैकी अंदाजे ४,००,००० रू किंमतीचे ४,७०० लिटर डिझेलची चोरी केली आहे.
फिर्यादी विनोद सतीष घाडगे (रा. पुनावळे) यांनी आरोपी अनंता धोडीराम घोरपडे (रा. ताथवडे), ड्रायव्हर बालाजी पंडीत कांबळे (रा. वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९७३/२०२३ भा.दं.वि कलम ३८१,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि काटे पुढील तपास करीत आहेत.

















