- व्हिजा नियमांचे केले उल्लंघन; गुन्हे शाखेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- दोघींनी संगणमत करून युगांडा देशातील पिडीत महिलेला पैशांचे अमिष दाखवत वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेने कारवाई करून एकाला ताब्यात घेतले. महिलेकडून १३,०८० रुपये किंमतीचा माल जप्त केला. तसेच तिसऱ्या सह आरोपीने तिचे घर हे दोघा आरोपी यांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिले. तसेच मुख्य आरोपी महिलेने तिचा व्हिजा मुदत संपलेली असताना देखील व्हिजा नियमांचे उल्लंघन केले.
हा प्रकार (दि. १७) रोजी रात्री ६.४५ वाजेच्या सुमारास विशालनगर, सांगवी येथे घडला. सांगवी पोलीस ठाण्यात ४३२/२०२३भा.द.वि. कलम ३७० (३), ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ सह फॉरेनर अॅक्ट १९४६ कलम १४ नुसार तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकीला अटक केली आहे. पोनि गुन्हे तांबे हे पुढील तपास करीत आहेत.


















