न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- जयंतीसाठी फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपींनी दमदाटी केली. गोंधळ घालून शिवीगाळ करुन पैसे न दिल्यास फिर्यादीला बेकरीचे दुकान उघडू न देण्याची धमकी दिली. फिर्यादीकडुन ११०० रुपये व आणखी एकाकडून ५०० रुपये असे एकुण १६०० रुपये रक्कम खंडणी घेतली आहे.
ही घटना (दि. ०२/०४/२०२३) रोजी न्यू इंटीवन बेकरी, चोधरी पार्क, वाकडमध्ये घडली. फिर्यादी मोहमद वसिम नासिर (वय २८ वर्षे, वाकड) यांनी आरोपी विशाल वैजनाथ वाव्हळकर (रा सदगुरु कॉलनी, वाकड), विशाल अशोक शिंदे (रा. वाकड), सुरज शंकर वाघमारे (वय २२ वर्षे, रा. वाकड), आकाश देविदास मनवर (वय २७ वर्षे, रा. वाकड), निखील आप्पा सोनवणे (वय १९ वर्षे, वाकड), अमित नानासाहेब वाघमारे (वय २७ वर्षे, रा. वाकड), किशोर राजू सुर्यवंशी (वय १९ वर्षे, रा. वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ८१०/२०२३ भादवि ३८४, १४३, १४७, १४९, ५०४,५०६ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना फोजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ४१ (अ) (१) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पोउपनि शिंगारे पुढील तपास करीत आहेत.















