न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- टी स्टॉलवर फिर्यादी थांबले होते. दरम्यान आरोपीबरोबर झालेल्या किरकोळ कारणाच्या वादावरुन आरोपीच्या सांगण्यावरुन सह आरोपी २ व ३ यांनी हातात लोंखडी कोयता सोबत आणला. तसेच त्यांच्यासोबत सह आरोपी ४ व ५ आले. सर्व आरोपींनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उददेशाने लोंखडी कोयता व सिंमेटच्या गटटुने मारहाण करीत फिर्यादीला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी १०.०० च्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडला. फिर्यादी मयुर चंद्रकांत शिंदे (वय २२ वर्षे, देहुरोड) यांनी आरोपी मयुर आवचरे, रिहान आरिफ शेख (वय १९ वर्षे, पिंपळे गुरव), अमन गिल, शब्बाज शेख, दानिश (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ४३३/२०२३ भा.दं.वि कलम ३०७,३४, आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पो. अधि.कलम ३७ (१) (३) सह १३५ सह क्रिमीनल अॅमेन्टमेंन्ट अॅक्ट १९३२ चे कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भोगम पुढील तपास करीत आहेत.















