- लोखंडी कोयते आजूबाजूच्या लोकांवर उगारून जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- जुन्या तक्रारीच्या कारणावरून मुख्य आरोपीसह आठ जणांनी फिर्यादी पल्सरवरून कॉलेजकडे जात असताना त्यांना थांबवले. फिर्यादी न थांबता पुढे जात असताना आरोपींनी दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला. शिवीगाळ करत आरोपी व सह आरोपी ३ याने फिर्यादीच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. आरोपी व सह आरोपी ४ यांनी त्यांच्याकडील कोयता बाहेर काढून फिर्यादीवर उगारला. सहआरोपी २ व ३ यांनी फिर्यादीस हाताने मारहाण करून हातातील लोखंडी कोयते आजूबाजूच्या लोकांवर उगारून त्यांना मारण्याची धमकी दिली.
मुख्य आरोपी आणि सह आरोपी ३ यांनी फिर्यादीच्या पॅन्टच्या डाव्या खिशातील २७५० रुपये जबरदस्ती काढून घेवून बाकीच्या इसमांनी फिर्यादीस हाताने मारहाण करून सर्वजण हातात कोयते घेवून त्यांच्या दुचाकीवर बसून परिसरात दहशत माजवत निघून गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी सायंकाळी ६.०० वा ते ६.३० च्या दरम्यान काळे कॉलनी ते इंद्रायणीनगर दरम्यानच्या रोडवर, आळंदी देवाची येथे घडला. फिर्यादी तेजस ज्ञानेश्वर गालफाडे यांनी आरोपी १) अर्जून वाघमोडे, २) ओमकार भोसले, ३) ओमकार गाडेकर ४) ऋषीकेश गडकर व चार अनोळखी आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपींवर ३८४ / २०२३भा. द. वि कलम ३९५, भारतीय हत्यार अधि कलम ४ (२५), क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट कलम ७ महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.















