न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- मोबाईल रिपेरिंगच्या दुकानासमोर आरोपीने विनाकारण फिर्यादीच्या दुकानात येवुन फिर्यादीचा मेहुना याला २०० रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादी यांच्याशी फोनवरून ‘२०० रुपये दिले नाही तर, मी सर्व फोडुन तोडुन टाकीन व तुला पण मारुन टाकीन’ अशी शिवीगाळ, दमदाटी केली.
पैसे देण्यास नकार दिल्यावर फिर्यादी यांच्या करिझमा दुचाकीवर दगड मारून गाडीची तोडफोड करून नुकसान केले. मोठमोठयाने आरडा ओरड करुन परीसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २१) रोजी सकाळी १०.३० वाजता चाकण येथील नेहरु चौक, श्री शिवाजी विदया मंदीराजवळ मोबाईलच्या दुकानात घडला.
फिर्यादी समीर रामासींग सिंग यांनी आरोपी प्रशांत बाबुराव दातार (रा. खंडोबामाळ, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ६८० / २०२३ भादवि ३८४, ३८५, ३८६, २९४,४२७,५०४, ५०६ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि राठोड पुढील तपास करीत आहेत.















