न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- आयशर ट्रक (एमएच२५एके४५५५) वरील आरोपी वाहन चालकाने हयगयीने, निष्काळजीपणाने, बेदरकारपणे वाहनं चालवुन फिर्यादी याचा चुलत भाऊ संदीप बबन हासे (वय ३५ वर्षे रा. काळेवाडी, सज्जनगड कॉलनी, राहाटणी) यांच्या दुचाकीला पाठीमागुन धडक देऊन अपघात केला.
अपघातात तोंडाला, पोटाला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादीच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. आरोपी वाहनचालक त्यास कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा अपघात (दि. २०) रोजी रात्री ११.२० च्या सुमारास मोशी चौक, जुना आंळदी रोड, मोशी, पुणे-नाशिक रोडवर घडला.
फिर्यादी सुनिल पंढरीनाथ हासे यांनी आरोपी रोहीत संजय अंधारे (वय २२ वर्षे रा. भांडगाव ता. परांडा जि. धाराशिव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एम आय डी सी भोसरी पोलिसांनी ३७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३०४(अ) २७९, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.















