न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- शेअर्समध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन फिर्यादीकडुन वेळोवेळी १,५५,३२८ रुपये घेतले. त्यावर सुरुवातीला फिर्यादीला एकुण ३,४९,००० रुपयांचा नफा दिला. फिर्यादीचा विश्वास संपादन करीत फिर्यादीस न विचारता परस्पर फिर्यादीच्या फाईव्ह पैसा या डिमॅट खात्यातून शेअर्समध्ये लावले. ते झिरो करुन फिर्यादीची एकुण १,५५,३२८ रुपये रक्कमेची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. २७/०१/२०२३ रोजी ते दि. ३१/०१/२०२३) पर्यंत फिर्यादीच्या राहत्या घरी साने चौक, मोरे वस्ती, चिखलीत घडला. फिर्यादी जयेश किसन पाटील यांनी आरोपी महिला, राहुल ठाकुर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ५६१/२०२३ भा.द.वि. कलम ४२०,४०६ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कुमटकर पुढील तपास करीत आहेत.















