- दुकानदाराकडे हप्त्याची मागणी करणाऱ्यांनी खाल्ली जेलची हवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- “तुझा धंदा जोरात चाललाय हा एरिया आमचा आहे. तुला येथे धंदा करायचा असल्यास, आम्हाला २०० रुपये हप्ता दयावा लागेल. पैसे न दिल्यास तुला घोडा लावु” अशी धमकी देवुन फिर्यादीकडून आरोपींनी आतापर्यंत ६०० रुपये रक्कम हप्ता म्हणून खंडणी घेतली आहे.
तसेच हप्ता दिला नाही म्हणून, त्यांनी फिर्यादीच्या दुकानात घुसुन फिर्यादी व त्याच्या भावाला ” का रे मादरचोद कुठे पळतो. आम्हाला हप्ता देत नाही. तू पोलीसांना बोलव किंवा कोणालाही बोलव. सुटून आल्यावर तूला व तुझ्या भावाला दुकानासकट जाळून टाकू.” अशी धमकी देवुन, हाताने, पायाने, चप्पलने मारहाण करुन, शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मे २०२३ ते दि. १९/०८/२०२३ दरम्यान अन्सारी हाड वैद्य दुकानासमोर व दुकानात, अॅपेक्स हॉस्पीटल जवळ, काळेवाडी फाटा, थेरगाव येथे घडली.
फिर्यादी आदिल जुबेर अहमद अन्सारी यांनी आरोपी शकिर ताहेर सय्यद, इमरान इब्राहिम शेख, हाजी मलंग दौलत शेख यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ८२४ / २०२३ भादवि ३८६, ३८७, ४५२, ३२३, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे .















