न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- आमिष दाखवुन फिर्यादीच्या मुलीला आरोपीने स्वतःच्या घरी नेले. फिर्यादीच्या मुलीच्या अवघड जागेमध्ये अश्लील कृत्य करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना (दि. २१) रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.३० वा. च्या दरम्यान भोसरी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी सुर्यकात इंचुरे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. भोसरी पोलिसांनी ६९६/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (३) (ए, बी) लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चेकलम ३, ४, ५ (आय), ५ (एम), ६, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोउपनि जोनापल्ले तपास करीत आहेत.















