न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- बळजबरीने दोघा महिलांकडून आरोपीने देहविक्री करवुन घेतली. त्या कमाईतील काही रक्कम महिलांना देवुन उर्वरीत रक्कम स्वतःकडे ठेवुन स्वतःची उपजीवीका भागवली.
हा प्रकार (दि. २२) रोजी २.३० वाजता डांगे चौक, थेरगाव येथे घडला. याप्रकरणी महिलेने आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात ८२६/२०२३ भादवि कलम ३७० (२), अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, प्रमाणे आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.












