- पिंपरीतील दोघांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- विनापरवनगी बेकायदेशीररित्या उझबेकिस्तान देशातील महिलेने मृत्युपूर्वी भारतात प्रवेश केला. मयत आरोपी महिलेने येथे राहण्यासाठी आरोपी क्र २ व ३ यांच्या मदतीने बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड बनवले.
पिंपरी पोलीस ठाणे, अकस्मात मयत रजि. क्रं. ९१/२०२३, सीआरपीसी कल १७४ प्रमाणे दाखल अकस्मात मयताच्या (दि.२९/०७/२०२३ ते दि. १८/०८/२०२३) तपासा दरम्यान घरोंदा रेसिडेन्सी हॉटेल, मोरवाडी, पिंपरी येथे दि.२२/०८/२०२३ रोजी रात्री ९.०३ वा. हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी मयत महिला आरोपी (वय ३९ वर्षे, मुळ रा. उझबेकिस्तान), २. मुकेश बक्षोमल केसवानी, ३. कृष्णा प्रकाश नायर यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात ८७२ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ व विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोउपनि सावर्डे पुढील तपास करीत आहेत.


















