- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- राजस्थान येथुन अफु (पॉपी स्ट्रॉ / डुडा) ची आंतरराज्यीय तस्करी करुन अवैधरीत्या गॅसविक्रीच्या नावाखाली उद्योगनगरी म्हाळुंगे / चाकण येथे काम करणाऱ्या तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या तीन राजस्थानी इसमांना सुमारे ६० किलो अफु (पॉपी स्ट्रॉ / डूडा) या अंमली पदार्थासह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
म्हाळूंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे म्हाळुंगे गावातील स्मशानभुमीच्या जवळ अविनाश पानसरे यांच्या गोडाऊनमध्ये काही इसमांनी अवैध अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) हा अंमली पदार्थाची विक्री करीता साठवणुक केली असुन ते विक्री करीता पॅकिंग करीत आहेत, अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथके तयार करून ते गोडाऊनला चारही बाजुने दबा धरून थांबले. तेथे घरगुती गॅस सिलेंडरने भरलेली एक टाटा एस हि चारचाकी गोडाऊनच्या दिशेने जाताना दिसली. पोलिसांनी ते वाहन ताब्यात घेवुन वाहन चालकास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राकेश जिवनराम बिष्णोई (वय २४ वर्षे रा. कारवा हॉटेलमागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे; मुळगाव करसंकला ता बाप जि. जोधपुर राज्य राजस्थान) असे असल्याचे सांगितले.
त्याच्यासह वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये एचपी गॅसचे भरलेले ३२ घरगुती गॅस सिलेंडर व पांढऱ्या रंगाचे नायलॉनचे पोत्यामध्ये ३ किलो अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ डुडा) मिळुन आला. त्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने समोर असलेल्या अविनाश पानसरेच्या गोडाऊनमध्ये त्याचे इतर ०२ साथिदार असल्याचे सांगुन ते अफुचा चुराची (पॉपी स्ट्रॉ/डुडा) साठवणुक करुन विक्रीकरीता पॅकिंग करीत असल्याचे व घरगुती गॅस सिलेंडर मधुन व्यावसायिक गैस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलींग करीत असल्याचे सांगितले. त्यास वाहनासह ताब्यात घेवुन लागलीच गोडाऊनमध्ये छापा टाकला असता दोन इसम मिळुन आले. त्यापैकी एक इसम घरगुती गॅस सिलेंडर मधुन व्यावसायीक गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलींग करताना व दुसरा इसम काळ्या रंगाचे नायलॉनची पोते झाकुन ठेवताना मिळुन आले.
कैलास जोराराम बिष्णोई (वय २३ वर्षे रा. कारवा हॉटेलच्या मागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुगे ता.खेड जि.पुणे मुळगाव जंबा किडानी ता बाप जि.जोधपुर), मुकेश गिरधारीराम बिष्णोई (वय २३ वर्षे रा. कारवा हॉटेलच्या मागे काळे यांचे बिल्डींगमध्ये म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे मुळ गाव नोकीडा चारनाना ता. फलोदी जि जोधपुर राज्य राजस्थान) अशी नावे असल्याचे सांगितले. सदर गोडाऊनची पाहणी केली असता गोडाऊनमध्ये ०३ काळे रंगाची नायलॉनची पोती त्यामध्ये अफुचा चुरा (पॉपी स्ट्रों/ डुडा). एक लाल पांढरे रंगाचा मिक्सर व त्याची भांडी, वजनकाटा, एचपी कंपनीचे निळे रंगाचे व्यवसायिक सिलेंडर व लाल रंगाचे घरगुती गॅसचे एकुण ५० सिलेंडर मिळून आले.
आरोपी राकेश जिवनराम बिष्णोई, कैलास जोराराम बिष्णोई व मुकेश गिरधारीराम बिष्णोई यांच्याकडुन एकुण १६,७०,१२२ रुपये किंमतीचे एकुण ०४ पोत्यांमध्ये एकुण ५८ किलो २८८ ग्रॅम अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ डुडा) हा अमली पदार्थ (किंमत ८.७४.३२०/-), एक टाटा फोरव्हिलर टेम्पो (किंमत ५,००,०००/-), ०४ मोबाईल (किंमत १,०५,०००/-), ८२ गॅस सिलेंडर (किंमत १,६७.५५२) ०१ वजनकाटा, ०१ मिक्सर, रिफलिंग पाईप, सिलिंग पॅकींग रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) हा त्यांनी पाहिजे आरोपी अनिलकुमार जाट (रा. भेटजोन्डी राज्यस्थान) यांच्याकडुन आणला. आरोपींनी धोकादायकरित्या घरगुती वापराचे सिलेंडर मधुन व्यवसायिक गैस सिलेंडरमध्ये लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल हे माहित असुन सुध्दा गॅस सारख्या ज्वालाग्रही पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे कृत्य करुन गॅस विक्रीचा व रिफलिंगचा कोणताही शासकीय परवाना नसताना, त्याचे ताब्यातील घरगुती वापराच्या गॅससिलेंडर मधुन दुस-या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये गैस रिफलिंग करताना गोडाऊनमध्ये मिळुन आले.
पाहिजे आरोपी अविनाश पानसरे रा. म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे याने कोणताही भाडेकरार न करता तिघांना गॅस रिफलिंगसाठी व अफुचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/ डुडा) विक्रीसाठी गोडावून भाड्याने दिले असल्याने त्यांचेविरुध्द म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १५(क), व २९, व भा.दं.वि. कलम ४२०, २८५, १८८, ३४ सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ कलम ३, ७ एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियम) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत असुन तिघे आरोपी दि २८/०८/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. सतीश माने, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सूर्यवंशी, मयुर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कुटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फुंदे, बाळु कोकाटे यांचे पथकाने केली आहे.












