न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- ‘हातउसने घेतलेले ४ लाख रुपये परत देतो’ असे सांगुन फिर्यादीच्या पतीला त्यांच्या दोन मित्रांनी (दि. २३) रोजी ५.२० ते ५.४५ च्या दरम्यान ग्रे रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमधून सांगवी फाट्याच्या पुढे भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या गेटचे जवळ रक्षक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. कारमध्ये व रस्त्यावर फिर्यादिचाय पतीला गोळ्या घालुन त्यांना गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महिला फिर्यादी यांनी आरोपी योगेश शरद जगताप (वय ३० वर्षे रा. संजय गांधी वसाहत स्पायसर रोड औंध, ऋषीकेश राजु खरात (वय २७ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ४४६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) (२७), महा. पोलीस अधिनियम प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे पुढील तपास करीत आहेत.












